Type Here to Get Search Results !

सोलापूर | जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सहकारमंत्र्यांच्या दारात ऊस दराबाबत आमरण उपोषण सुरू


स्वाभिमानी शेतकरी संघटना 
खासदार राजू शेट्टी साहेबांच्या मागणीप्रमाणे सोलापुरातील उसाला एफआरपी अधिक दोनशे प्रमाणे चालू गळीत हंगामाला एक रकमी बिल मिळावे याकरिता गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सतत प्रयत्न केले .जिल्हाधिकारी पालकमंत्री तसेच सहकार मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊनसुद्धा शिकणे ही दखल घेतलं गेले नाही .राज्याचे सहकारमंत्री सोलापूर जिल्ह्यातील असून सुद्धा कोल्हापूर सांगली सातारा प्रमाणे त्वरीत निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न केले नाही . दुष्काळ व हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस गाडयांना अडवता लोकशाहीच्या मार्गाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सहकारमंत्र्यांचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे पंढरपूर विभाग अध्यक्ष समाधान फाटे ,उपाध्यक्ष श्रीनिवास भोसले ,पंढरपूर तालुका अध्यक्ष नवनाथ माने ,माळशिरस युवा अध्यक्ष मदनसिंह जाधव ,मारा युवाध्यक्ष बापू गायकवाड व अजित कोडक या स्वाभिमानी शिलेदारांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .
चालू गळीत हंगामातील उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रमाणे त्वरित ऊस बिल मिळावे ,चौदा दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असताना पंचवीस दिवस झाले कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही त्यामुळे त्वरित ऊसबिल जाहीर करावे ,मागील वर्षीचे एफआरपी अधिक चारशे रुपये त्वरित मिळावे ,सिद्धेश्वर मातोश्री गोकुळ या कारखान्यांनी ऊसबिल जमा केल्याचे खोटी माहिती साखर आयुक्तांना दिली आहे यांची त्वरित चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी .यावेळी महामुद पटेल विजय रणदिवे उमाशंकर पाटील नरेंद्र पाटील शिवाजी भाऊ पाटील सिद्धेश्वर घुगे गोपाल घाडगे श्रीमंत शंकर संघ शेट्टी महावीर सावळे नरहरी वारे इकबाल मुजावर पंडित चव्हाण तात्या सावंत सह परिसरातील शेतकरी उपस्थित आहेत .उमाशंकर पाटील ,स्वा.शेतकरी संघटना सचिव. सोलापुर
वरील मागण्या सहकार मंत्र्यांनी त्वरित पूर्ण करावे व जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवावा अन्यथा हे आमरण उपोषण असेच चालू राहील .  .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad