Type Here to Get Search Results !

जांबुड ग्रामपंचायतीवर नारायण पाटील गटाचा झेंडा कायम

जांबुड ग्रामपंचायतीवर नारायण पाटील गटाचा झेंडा कायम.



माळशिरस तालुक्यातील जांबुड ग्रामपंचायत निवडणुक 2017/18 मध्ये 13 पैकी 9 जागा जिंकुन जांबुड गावचे जेष्ठ नेते मा.नारायण रामचंद्र पाटील यांनी 25 वर्षे आपली सत्ता कायम ठेवली आहे. या झालेल्या निवडणुकीत ते स्वता वयाच्या 65 व्या वर्षी भरगोस मतांनी निवडुण आले आहेत. तर जनतेतुन निवडून आलेले मा.अविनाश हणुमंत खरात यांना सरपंच पदाचा पदभार देण्यात आला तर मा.नारायण रामचंद्र पाटील यांना बहुमताने उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली ही निवड होताच कार्यकर्त्यांनी हालग्यांचा कडकडाट करुण फाटक्यांची आतिष बाजी केली तसेच गवामधुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली व सर्व ग्रामस्थांच्या वतीने नुतन उपसरपंच नारायण पाटील  व नुतन सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री.नारायण पाटील म्हणाले की माझ्या वयाच्या 65 व्या वर्षी जो गावातील जनतेने माझ्या सहकार्यांनी व कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी तडा जाऊ देणार नाही माझ्या अंगाच्या कातड्याच्या चपला करुन जरी जांबुड गावच्या जनतेला घातल्या तरी त्यांच   ऋन फिटणार नाही इतके उपकार गावाने गावाने माझ्यावर केले असुन माझ्या जीवनातील हा विस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सागीतले. जनतेची सेवा आणि गावचा विकास हे एकच स्वप्न डोळ्यांसमोर आहे असे ते म्हणाले.


या वेळी  मुरलिधर कचरे,शिवाजी केचे,आण्णासो पाटील, नागनाथ कचरे, प्रकाश केचे,अरुण धुमाळ,दिनकर केचे, हरिदास पाटील,विजय केचे,आप्पासो पाटील, मारुती पाटील, विलास केचे,सदाशिव पवार,हणुमंत बेलदर,शिवाजी धुमाळ, रविराज बनसोडे,अनिल पाटील, रविंद्र पाटील,लालासो गुळुमकर, हरिदास धुमाळ,आप्पासो हांडे, नितीन वाघमारे, रशीद शेख,लखन गाडे,संतोष पाटील, सत्यवान चंदनशिवे, शिवाजी नाईकनवरे,दिलावर मुलाणी,एकनाथ सुरवसे,गणेश नलवडे,व हजारो ग्रामस्थ वकार्यकर्त्ये उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad