महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा चाचणी अकलुज येथील श्रीराम मंदीर येथील कुस्ती स्पर्धेत ६१ किलो माती विभागात पैलवान अजय भुसनर ने प्रथम क्रमांक आला व अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धैत तो खेळणार आहे.
यावेळी सत्कार करुन शुभेच्छा देताना सोलापूर जिल्हा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष व युवा उद्योजक पैलवान मा.विजय दादा भुसनर यांनी अजय ला कुस्ती बद्दल मार्गदर्शन केले व भविष्यात तुला कुस्ती क्षेत्रात नाव करण्याची खुप मोठी संधी असल्याचे सांगितले.
यावेळी पैलवान अजय ला शुभेच्छा देण्यासाठी हटकर समाजाचे नेते विठ्ठल कारखाना चे मा.संचालक मा.दत्तात्रय चौगुले साहेब व शिरढोण ग्रामपंचायत चे मा.सरपंच आण्णासाहेब भुसनर साहेब,हटकर समाजाचे अध्यक्ष भिमराव भुसनर ओबिसी नेते सागर गोडसे महाराष्ट्र पोलिस भास्कर गोडसे संभाजी भुसनर व पैलवान विराज विजय भुसनर उपस्थित होते.