अकलूज येथे जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा चाचणी कुस्ती स्पर्धा श्रीराम मंदिर अकलुज येथे आयोजित करण्यात आली होती. त्या मध्ये जांबुड गावचा पैलवान अजय भिमरव भुसनर यांने ६१ किलो वजन गटात माती विभागात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर येथे निवड झाल्या बद्दल शिवपार्वती मंदिर समिती व समस्थ ग्रामस्थ यांच्या वतीने आज संध्याकाळी 8:30 वाजता शिवपार्वती मंदिर समोर सत्काराचे आयोजन जांबुड गावाचे युवा नेतृत्व मा.महावीर माने उपसरपंच जांबुड यांनी केले होते. यावेळी जांबुड ग्रामपंचायतीचे नेते मा.तुकाराम हांडे मा.बापु मोरे संचालक जांबुड विकास सोसायटी, शिवसेना नेते बाबासाहेब पाटील, दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रदिप नाईकनवरे, हटकर समाज महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा सुरेश आण्णा पाटील अध्यक्ष भिमराव भुसनर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.नाना कचरे आर.पि.आय.तालुका अध्यक्ष मा.रविराज बनसोडे सर र्डॉक्टर वैभव मगर, युवा नेतृत्व मा. शिवाजी कचरे ,एकनाथ सुरवसे ,नागनाथ केचे ,पोपट माने दादा शेख प्रविण माने, पोपट व्हरगळ ,महावीर बनसोडे, सतीश नाईकनवरे तुकाराम व्हरगळ, महेश धुमाळ, वैभव नाईकनवरे शहाजी पाटील, विजय भुसनर, वैजिनाथ पाटील कुमार रोहन सुरेश पाटील लक्ष्मण पवार, पैलवान सुजय भुसनर उपस्थित होते.