Type Here to Get Search Results !

अशिक्षित आई वडिलांच्या पोटी उपजले देशसेवेचे बीज

अशिक्षित आई वडिलांच्या पोटी उपजले देशसेवेचे बीज 

संदेश गांगुर्डे सैन्य दलात दाखल 

संबंध गावाने साजरा केला महोत्सव 

मोखाडा :सौरभ कामडी 


मोखाडा : मोखाडा तालुक्यातील अटी दुर्गम आणि छोटे खाणी आडोशी गावात विलास कचरू गांगुर्डे हे बौद्ध कुटुंब वास्तव्य करून राहत आहें परंतु प्रसार माध्यम किंवा कोणतीही माहीत मिळण्याचा अभाव असताना देखील गांगुर्डे यांचा मुलगा संदेश याने अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलात महार महार बटालियन मध्ये आपली वर्णी लावून घेतली आहें त्याची हि देशभक्ती पाहून बौद्ध समाज बांधवां सोबतच संपूर्ण गावाने संदेशला शुभेच्छा देत अक्षरशः महोत्सव साजरा केला आहे. 

संदेश गांगुर्डे यांनी मध्यप्रदेश मधील सागर महार रेजिमेंट सेंटर येथे 22 मार्च ते 3 डिसेंबर दरम्याच्या नऊ महिन्यात कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेतले आहें सिक्कीम येथे 18 मार्च रोजी जनरल ड्युटी पोस्टवर देश सेवेसाठी आता तो रुजू होणार आहें बाहेरचे जग पाहिले नसतानाही एका अशिक्षित कुटुंबाने आपल्या मुलाला देश सेवेसाठी पाठविण्याचे धाडस करणे हे इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहें 

 ऊन, वारा पाऊस, हिम वर्षा किंवा कोणत्याही आपत्ती जन्य वातावरणात सीमेवर खंबीरपने देशाचे संरक्षण करण्याचे भाग्य लाभने हि कौतुकास्पद बाब आहें आणि अशिक्षित कुटुंबातून स्वतःच्या प्रयत्नातून हि संधी मिळविणे या सारखे दुसरे भाग्य नाही असे गौरवोद्गार मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी काढले आहेत

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवली की यश हाकेच्या अंतरावर असते मात्र त्याच्यावर धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची गरज असते हि बाब लक्षात घेऊन संदेशने स्वतःच्या मेहनतीवर भारतीय सैन्य दलाला गवसनी घेतली आहें याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन मोखाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी केले आहें तर देशशेवेचा वसा घेऊन देशाचं रक्षण करण्याचा जन्मजात वसा लाभने हि भाग्याची गोष्ट असल्याचे मत ग्रामपंसंचायत विस्तार अधिकारी महेंद्र उबाळे यांनी व्यक्त केले आहें 

 कार्यक्रमा साठी भाऊराव गांगुर्डे रेल्वे गार्ड, ईश्वर गांगुर्डे समाज सेवक, प्रकाश दोंदे मॅनेजर,बाळू घाटाळ सरपंच, चंद्रकांत गांगुर्डे, रघुनाथ गांगुर्डे, बाळू गांगुर्डे, प्रकाश गांगुर्डे,अनंता पाटील,रमेश पाटील, मंगेश दाते सर्व पंचक्रोशीतील नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सूत्र संचालन संजय साळवे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News