विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्ह्यात इतर कारखान्यापेक्षा आपण एक रुपया ऊसाला जास्त देऊ असे जाहीर केले मात्र त्यांच्या याच घोषणेमुळे ते शेतकरी संघटनेचे टिकेचे बळी ठरत आहेत त्यातच माझा जर साखर कारखाना असता तर मी इतर कारखान्यांपेक्षा उसाला एक हजार रुपये जास्त दर दिला असता असा खोचक टोला रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला आहे
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून माढा विधानसभेची हळद अंगाला लावून चालू वर्षी ऊसाला साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले मात्र पाटलांच्या अवकाळ गाभणे धोरणावर शेतकऱ्यांचा काय विश्वास बसत नाही मात्र त्यांच्या या पेल्यातील वादळामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्या वाड्यात प्रचंड प्रमाणात राख घुसली त्यामुळे विद्यमान आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत कारण कुठल्याही परिस्थितीत यावेळी आपल्या लेकराला मुंबईच्या सभागृहात पाठवायचे असा त्यांनी दृढ निश्चय केला आहे मात्र आपला पुत्र अकार्यक्षम आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद सुद्धा त्याला दिले नाही कारण बबन दादांना पण चांगली माहिती आहे दूध संघाचे चेअरमन केलं मात्र त्याने तो दूध संघ देशोधडीला लावला कारखाना दिला तर त्याची राख रांगोळी करून हा आपला पोरगा शिवरत्न बंगल्यावर रोज तीन टाईम मुजरा घालायला हजर होईल एवढ्या निष्क्रिय आमदार पुत्राला तीन तालुक्यातील जनता शिंगणापूरचा घाट दाखवण्याचे स्वप्न बघत असताना मध्येच मोहिते पाटलांना पण आमदारकीचे डोहाळे लागले भावी आमदार म्हणून ते सध्या मिरवत आहेत परंतु लोकसभेला चहा सुद्धा न पिता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जनतेने भरभरून प्रेम दिले त्यांच्यावरती विश्वास दाखवून एक लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांना दिल्लीत पाठवले आता परत विधानसभेसाठी मोहिते पाटील घराण्यातीलच लोक पुढे येत असतील तर लोकांना ते कदापि आवडणार नाही शिंदे घराण्याची झुंडशाही गुलामगिरी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रस्थापित विस्थापित लोकांनी एकत्र यावे आणि शिंदे बंधूंना राजकारणातून येणाऱ्या विधानसभेला निवृत्त करावे असे रोखठोक विधान रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटणार आहे...