मोखाडा :सौरभ कामडी
सकाळी शाळेतील मुलींनी ढोलाच्या तालावर लेझिम खेळत गावातून प्रभातफेरी काढली मुलांनी देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडला. शाळेत आल्यावर तर मुलींनी संदेशे आते है या गाण्यावर अप्रतिम लेझिम नृत्य केले व उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रमासाठी ह्या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून सेल्स टॅक्स असिस्टंट कमिशनर पोवणकर साहेब सपत्नीक उपस्थित होते . तसेच गावचे सुपुत्र सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. अशोक कामडी साहेब उपस्थित होते . ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी केलेल्या मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषणे एकूण पाहुणे भारावून गेले .जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी जे इयत्ता दहावी आणि बारावी ला पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची चमकले अशा विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला . सकाळी शाळेत विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत तंबाखू आणि व्यसन मुक्तीची शपथ ही घेण्यात आली . मुख्याध्यापक दिनकर फसाळे सरांनी शाळेची यशोगाथा पालकांसमोर मांडताना iso शाळा ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पर्यंत मजल मारताना . ग्रामस्थ, पालक , स्पार्क फाऊंडेशन , लक्ष फाऊंडेशन सारख्या विवीद्ध सामाजिक संस्थांनी केलेल्या शाळेला मदती बद्दल त्यांचे ही आभार मानले .