मोखाडा, जव्हार,विक्रमगड वाडा तालुक्यात काळयाफिती लावून आंदोलन
मोखाडा : प्रतिनिधी सौरभ कामडी
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूर येथील एका शाळेतील दोन चीमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेचे पडसाद देशभर उलटले यासाठी महाविकास आघाडीने काल राज्यात बंद पुकारला होता यांनतर या बाबत जिल्हयातील सर्व तालुक्यात बंदचे आवाहन आणि निवेदनही देण्यात आले. मात्र ऐनवेळी न्यायालयाने बंद बेकायदा असल्याचे सांगितल्या नंतर मविआ ने सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले याला पालघर जिल्हयातील मविआ कडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यात भर पावसात हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व मविआ पदाधिकारी यावेळी सामील झाले होते.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआने बंद मागे घेत काळया फिती लावून भरपावसात हे आंदोलन केले मोखाडा तालुका बस स्थानकावर तिन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांनी काळयाफिती लावून सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी लाडक्या बहिणीला पैसे नको संरक्षण हवे, महायुती सरकार मुर्दाबाद, निष्क्रीय सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देवून सरकारचा निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदनही मोखाडा पोलिसांत देण्यात आले याप्रमाणे जव्हार विक्रमगड वाडा या तालुक्यातही हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करीत हे सरकार फक्त फसव्या योजना आणत आहे मात्र आई बहिणींचे संरक्षण करण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशीद शेख यांनी महाविकास आघाडी एकत्रपणे एकदिलाने लडत असून हम सब एक है म्हणत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप मोहंडकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्स....
मोखाडा तालुका पत्रकार संघाकडूनही निषेध
बदलापूर येथील घटनेची बतामी करणारी पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी उर्मट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात न आल्याने त्यावर तात्काळ कारवाई व्हावी अटक व्हावी अशी मागणी मोखाडा तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली असून यावेळी सर्व पत्रकारांनी काळयाफिती लावून मोखाडा पोलिसांना निवेदन दिले.