जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर :-
ढाणकीसह ग्रामिण भागातील नागरिक मुलभुत हक्काच्या सुविधांपासून अद्यापही वंचित असल्याने विविध ज्वलंत मागण्यांसंदर्भात शासनाने सहानुभुतीपूर्वक विचार करावा अन्यथा येत्या १० ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वैद्यकीय व्यवसायी डॉ विजय कवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे .
नगरपंचायत असलेल्या ढाणकी शहराला २० दिवसाला पाणी पुरवठा होतो . येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याने शासनाने योग्य पावले उचलून समस्या सोडवावी . टेंभेश्वरनगर येथील रहिवाशांना गाव नमुना आठ अ देण्यात यावा .ढाणकी शहरातील चिखलमय रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी .बंदी भागातील रहिवाशांच्या वर्ग दोन च्या जमिनी वर्ग १ मध्ये शासन दप्तरी नोंद व्हावी .बंदी भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करावे . ढाणकी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा .मंजूर यादीतील घरकुलधारकांना तात्काळ घरकुलाचा लाभ द्यावा .नदीकाठावरील शेतकऱ्यांना शासनामार्फत पाईपलाईन देण्यात यावी .रेशनच्या धान्यापासून वंचित असलेल्या गरजूंना धान्याचे वितरण व्हावे अशा ज्वलंत मागण्यांसाठी ढाणकी येथील वैद्यकीय व्यवसायी तथा माजी जि .प . सदस्य डॉ. विजय कवडे यांनी १० ऑगस्टपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे .