मोखाडा :सौरभ कामडी
स्पार्क फाऊंडेशन ठाणे यांच्या तर्फे जि .प .शाळा कोचाळे (ता.मोखाडा जि.पालघर) येथील १३१ विद्यार्थ्यांना दुरेघी ,चार रेघी, वह्या ,गणित चौकडी वह्या , पेन ,पेन्सिल, शोर्रपनर,खोड रबर,असे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्पार्क फाऊंडेशन चे जिल्हा अधिकारी . नितीन पिठोले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष . अशोक झुगरे , दिनकर फसाळे सर . जोशी सर. वाघ सर ठोंबरे सर. ग्रामस्थ व सर्व शिक्षक उपस्थित होते स्पार्क फाऊंडेशन शिक्षणासाठी नेहमी तत्पर असते आज पर्यंत अनेक शाळा इमारत बांधकाम , इमारत दुरुस्ती , विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य अशी अनेक शिक्षणउप योगी कामे स्पार्क फाऊंडेशन मार्फत मोखाडा तालुक्यात केली आहेत .