Type Here to Get Search Results !

दुधाचे दर वाढवा अन्यथा विधानसभेत शेतकरी भाजपचा सुपडासाफ करतील - राहुल बिडवे

दुधाचे दर वाढवा अन्यथा विधानसभेत शेतकरी भाजपचा सुपडासाफ करतील -  राहुल बिडवे


दूध दर कपातीवरून राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 35 रुपयांच्या आत दूध खरेदी करणार नाही असा जीआर काढून सुद्धा दुधाचे भाव पाडले गेले दुधाच्या दरासाठी समिती नेमली गेली दर तीन महिन्यांनी या समितीने बैठक घेऊन दुधाची वाढ करणे असे ठरले असताना ते दूध दर समिती कुणाच्या ताटाखालची मांजर बनली आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे महाराष्ट्रात दुधाचे दर हे राज्यकर्ते यांच्या आशिर्वादाने पाडले गेले एक वर्षांपासून दुध उत्पादक तोटा सहन करत आहे अडचणी मध्ये आहे आणि आता जर दुध उत्पादकांना न्याय दिला नाही तर येणाऱ्या विधानसभेत शेतकरी भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ केल्याशिवाय रहाणार नाही असा ईशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहुल बिडवे यांनी दिला .

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात जो निकाल मिळाला तो खरोखरच चितंन करण्यासारखा आहे कांदा,दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला परंतु सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही दुधाला चौतीस रुपये दर व पशुखाद्याचे भाव पच्चवीस टक्के कमी करणार म्हणून दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिआर काढला परंतु त्यांची अमंलबजावणी त्यांनी केलीच नाही त्यामुळे लोकसभेत सुजय विखे यांना शेतकऱ्यांनी कांदा चारुन आपला आक्रोश व्यक्त केला राज्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी असताना दुधाचे भाव गगनाला भिडायला पाहिजे होते मात्र हे सरकारचं उरफाट उलट धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगोटी वरती बसलेला आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे पशुखाद्याच्या किमती वाढल्या चाऱ्याच्या किमती वाढल्या दवाखान्याचा खर्च वाढला अशा परिस्थितीमध्ये दूध धंदा कसा काय करायचा हे असं जर दूध दराची कपात होत राहिली तर शेतकरी दूध धंदा बंद करेल आणि याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढेल यामुळे लहान मुले वयोवृद्ध यांचे आजार वाढतील त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसेल सरकारने तातडीने दूध धंद्यामध्ये लक्ष घालावे अन्यथा दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असे बिडवे यांनी सांगितले 

भाजप नेतृत्वाने कांदा उत्पादक व दुध उत्पादक शेतकरी यांचे तातडीने प्रश्न मिटवावेत गेल्या एक वर्षांपासून दुधाचे भाव पधंरा रुपयांनी जाणीवपूर्वक पाडण्यात आले सरकारने प्रतिलिटर 40 रुपये दुधाला दर द्यावा

 राहुल बिडवे राज्य प्रवक्ते रयत क्रांती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News