राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मांनी आता शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
धीरज यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचं सांगितलंय.
तसंच त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनाही या पोस्टमध्ये टॅग केलंय.
तर धीरज यांच्या पाठोपाठ सोनिया दुहान देखील शरद पवारांची साथ सोडणार असल्याचं कळतंय.
सोनिया या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या.
दरम्यान, सोनिया-धीरज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं समजतंय.