31 मे 2024 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती . मनिषा आव्हाळे मॅडम व जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉ . सुहास माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णाल सोलापूर येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संतोष नवले सर यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन व पोस्टर प्रदर्शनचे उद्धघाटन करण्यात आले सदर कार्यक्रमा करीता अतिरिक्त जिल्हा शल्याचकित्सक मा . डॉ . क्षिरसागर सर, बाह्यसंपर्क अधिकारी मा . डॉ . कुलकर्णी सर, महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ . ढवळे मॅडम, मेट्रन मा . श्रीमती .बेले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते .
तसेच तंबाखू नियंत्रण कक्ष , सारथी युथ फॉडेशन व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर पथनाट्य मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली . सदरील कार्यक्रमा करीता रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व शहरातील सामान्य जनता तसेच जिल्हा दंत शल्य चिकित्सक डॉ .पल्लवी अंबोरे , समुपदेशक श्रीमती मंजूश्री मुळे, सामाजिक कार्यकर्ता श्री .अमित महाडिक श्री.रामचंद्र वाघमारे व श्री .दिपक गुंजे आदी कर्मचारी उपस्थित होते .