Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव केंद्र नारोडी यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव केंद्र नारोडी यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी इयत्ता पहिलीला प्रवेश घेतलेले 23 विद्यार्थी नवीन नवीन गणवेशात आले होते .


या सर्व विद्यार्थ्यांची गावातून ढोल ताशाच्या गजरात लेझीमच्या ठेक्यावर वाजत गाजत मिरवणूक शाळेपर्यंत काढली तदनंतर विद्यार्थ्यांचे महिला शिक्षिका यांनी औक्षण केले सर्व शिक्षक इतर विद्यार्थी यांनी पुष्पवृष्टी करून विदयार्थ्याचे स्वागत केले .विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिलं पाऊल कायमस्वरूपी लक्षात राहावे म्हणून कोऱ्या कागदावर त्यांच्या पाऊलांचे छाप घेण्यात आले . 


व ते सर्व पालकांना आठवण म्हणून दिले .त्यानंतर विद्यार्थ्यांची नाव नोंदणी , वजन उंची घेणे . विविध बौद्धिक खेळ गेम असे विविध आठ टेबल लावले होते . विद्यार्थी , पालक ,शिक्षक यांच्या साठी सेल्फी पॉईंट सुद्धा उभारला होता . 


विद्यार्थ्याना गुलाबपुष्प , कॅडबरी बिस्किट व सर्व पालकांना व विद्यार्थ्याना स्वादिष्ट स्नेहभोजनाचे शाळेतर्फे आयोजन केले होते . विद्यार्थी व पालक यांना शाळापुर्व तयारी पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली . 


याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हेमंत काळे मा . मुख्याध्यापक जंगम गुरुजी , श्री ,भागवत .श्री शेख हे उपस्थित होते . वर्गशिक्षिका सौ ललिता तुरे , सौ सुनिता घोडे , सौ नंदा केंगले , श्री राजाराम काथेर ,सौ. जयश्री कर्पे व सौ शिंदे मॅडम, सौ निलम सुर्यवंशी ,श्रीमती सुर्यवंशीताई व मुख्याध्यापिक श्रीमती अलका चासकर यांनी सर्व नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . राजाराम काथेर तर आभार सौ .ललिता शेळके यांनी मांडले.

प्रतिनिधी आकाश भालेराव
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad