Type Here to Get Search Results !

राजगुरूनगर शहरात भगवान महावीर जयंती साजरी

राजगुरूनगर शहरात भगवान महावीर जयंती साजरी 


आज राजगुरूनगर शहरात शहरातील जैन बांधवानी मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करत भगवान महावीर जयंती साजरी केली.


सकाळी संपूर्ण शहरातून सर्व जैन भांगिनी व बांधवानी मिळून मिरवणुकीत शहभाग घेतला... 


तसेच या वेळी एकत्रित गरब्याचा आनंद सुद्धा घेतला. यंदाच्या वर्षी ह्या मिरवणुकीत सहभागी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ़ झालेली दिसून आली.... 


तसेच महिला व लहान मुलींचा गरबा खेळताना वेळी उत्साह पाहण्याजोगता होता..


मिरवणूकदरम्यान जैन धरमार्थ हॉस्पिटल तर्फे अध्यक्ष संतोष बोथरा व हॉस्पिटल टीम कडून थंडगार सरबत वाटप करण्यात आले तसेच मिरवणूक संपताना मुनीसूव्रत जैन सकल संघ , राजगुरूनगर संघाकडून सुद्धा दूध कोल्ड्रिंग ची व्यवस्था करण्यात आली होती.....


तदनंतर जैन स्थानक येथे सर्व मंदिरमार्गी तसेच स्थानकवासी व अवांतर बंधू 
भगिनींनसाठी व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आले होते...


दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा जैन सकल संघा तर्फे रक्तदान शिबीर तसेच साव्दिष्ट जेवण्याचा प्रसाद सुद्धा ठेवण्यात आला होता.....


दुपारी एक वाजे पर्यंत रक्तदान शिबिरात जवळपास 100 च्या वर क्रमांक गाठला होता.....


तसेच आज ह्या कार्यक्रमाचे आयोजन मुनीसूव्रत जैन सकल संघ, राजगुरूनगर यांचे अध्यक्ष संजय राठोड, परेश शहा व अन्य अनेक बंधू यांचे सह नूतन जैन सकल संघ अध्यक्ष अजय बलदोटा , उपाध्यक्ष मनीष बोरा, तसेच अन्य सर्व समाज बांधवानी केले...

प्रतिनिधी :- आकाश भालेराव 
खेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad