Type Here to Get Search Results !

मोबाईल नेटवर्क हरवले आहे ❓नेटवर्क चा झाला बट्याबोळ


मोबाईल नेटवर्क हरवले आहे ❓

घोडेगाव ता.आंबेगाव येथे मोबाईल नेटवर्क हरवले आहे ❓सध्या अशीच काहीशी परस्तिती घोडेगाव परिसरात पाहायला मिळत आहे , म्हणायला गेल तर घोडेगाव येथे सगळ्या कंपन्यांचे नेटवर्क टॉवर आपल्याला पाहायला मिळतील परंतु नेटवर्क चा सर्व बट्याबोळ झालेला पाहायला मिळत आहे , घोडेगाव हे तालुक्या तील सर्वात महत्वाचे गाव म्हणून ओळखले जाते , तहसील कचेरी असो कोर्ट असो अनेक सरकारी कार्यालय घोडेगाव येथे आहेत , परंतु सध्या घोडेगाव परिसरातील नागरिकांना नेटवर्क मुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे , घोडेगाव ते जुन्नर फाटा सादरांता 1 की.मी अंतर आहे परंतु जुन्नर फाट्या वरील जिओ टॉवर ची रेंज ही घोडेगाव गावात अतिशय खराब स्वरूपत पोहचे कॉल येतात परंतु समोरच्याला आजाव जात नाही किंवा त्याचा आपल्याला येत नाही , घोडेगाव परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील हा प्रॉब्लेम जिओ कंपनी द्वारे सोडवला जात नाही अशी घोडेगाव परिसरातील नागरिकांची तक्रार आहे आणी अश्याच प्रकारे घोडेगाव मधील इतर कंपन्याच्या टॉवर ची रेंज ही जुन्नर फाटा भागात वेवस्तीत येत नाही , सर्व कंपन्यांच्या टॉवर ची रेंज साठी 1 की.मी ही वेवस्तीत येत नसल्या मुळे घोडेगाव , जुन्नर फाटा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे , व वारंवार तक्रार देऊन देखील या सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्या दाखल घेत नसल्याचे नागरिक सांगत आहे , घोडेगाव , जुन्नर फाटा परिसरातील नागरिकांची सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडे लवकरात लवकर रेंज प्रॉब्लम ठीक करून वेवस्तीत रेंज पुरवठा द्यावा अशी मागणी आहे.

प्रतिनिधी :- आकाश भालेराव 
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad