Type Here to Get Search Results !

आंबेगाव वसाहतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन


आंबेगाव वसाहतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन
आंबेगाव वसाहत
दिनांक १२/३/२०२४
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.


 याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव घोलप सरपंच प्रमिला घोलप उपसरपंच परविन पानसरे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद भांगरे , विजय घोलप , युवराज तारडे , मुख्याध्यापक अविनाश ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.


यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेगाव वसाहती मधून यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत व यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने काढण्यात आली .


यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने आंबेगाव वसाहतीमध्ये रंगभरण स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा आणि बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकुर यांनी दिली यामध्ये आंबेगाव वसाहतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत . 
प्रथम क्रमांक - कार्तिकीय किशोर सोमवंशी द्वितीय क्रमांक - सृष्टी मनोजकुमार सरदार तृतीय क्रमांक - ज्ञानेश्वरी बाळू भालेराव उत्तेजनार्थ - तेजस्विनी अंकुश गवारी 
रंगभरण स्पर्धेतील विजेते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत 
 प्रथम क्रमांक -आराध्या रोहिदास गवारी द्वितीय क्रमांक - अद्‌विका तुषार तळेकर तृतीय क्रमांक - अनघा मधुकर सरकुले उत्तेजनार्थ - ज्ञानदा दत्तात्रय भागवत
चित्रकला स्पर्धेतील विजेते यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत
 लहान गट प्रथम क्रमांक - निधी श्रीपाद काळे द्वितीय क्रमांक - एकता रामश्रय प्रसाद तृतीय क्रमांक - सिद्धी संदीप लोहकरे उत्तेजनार्थ- तनिष्का महेश पवार चित्रकला स्पर्धेतील विजेते
 मोठा गट प्रथम क्रमांक - ध्रुव सुरेश कापडणीस द्वितीय क्रमांक - अष्टमी रवींद्र पानमंद तृतीय क्रमांक - दर्शन विकास पराड उत्तेजनार्थ - ईश्वरी प्रवीण लोहकरे
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती चे नियोजन वंदना मंडलिक , लक्ष्मी वाघ ,गौरी विसावे , राधिका शेटे , वैभव गायकवाड संतोष पिंगळे , लक्ष्मण फलके ,सुभाष साबळे यांनी केले .
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वळसे यांनी केले आणि आभार प्रदर्शन वैशाली काळे यांनी केले .

प्रतीनीधी आकाश भालेराव 
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad