मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याच्या विरोधात आता ओबीसी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात 1 फेब्रुवारीला आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
ओबीसी लेकरांच्या तोंडाचा घास पळविण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.