मनसेच्या आंदोलनाला यश; वेकोली कडून नुकसान भरपाई देण्यास सुरूवात
प्रतिनिधी/वणी
वणी येथील पैनगंगा, कोलगाव आणि मुंगोली खदानीतून दिवसाकाठी हजारो टनाच्या कोळशाची वाहतूक होत असते. परंतु सादर कोळसा वाहतूक नियमबाह्य होत आहे त्यामुळे रस्त्याची दुर्दशा तसेच परिसरातील येनक, येणाडी, कोलगाव, साखरा, कुर्ली, शिवणी, शेवाळा या ७-८ गावातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तर या गावातून जाणारा रस्ता पूर्णतः उखडून गेला होता. या शेती पिकांचे झालेल नुकसान भरपाई मिळावी याकरिता मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी गेले काही दिवस ही वाहतूक बंद केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्यासह वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, महसूल विभाग, कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकी दरम्यान वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कडून घोषित केलेली भरपाई तात्काळ देण्यात यावी तर यावर अधिक भरपाई वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बोर्डाकडे पाठपुरावा करुन ती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून ही मदत मिळवून द्यावी अशी मागणी राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मनसेच्या या आंदोलनाने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड खडबडून जागे झाले असून या आंदोलनाला यश आले आहे. या रस्त्यासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. तर शेती पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करुन त्यांना आज मुंगोली येथिल वेकोलिच्या कार्यालयात मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांना प्राथमिक स्वरूपात चेक मिळाले आहेत आणि उर्वरित चेकचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यावेळी धीरज पिदुरकर, सुभाष वासाडे, साई उगे, नरेंद्र गोखरें, विट्ठल पानघाटे, दत्ता पंडीले, बंडू गोरे, शंकर हिरदवे, मंदा आवारी, सुभाष मिलमिले यांच्या सह सर्व शेतकरी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते..
शेतकरी हिताचा विचार करत आपण नेहमी कार्यतत्पर राहिलो आहोत. या कार्यतत्परतेमुळे आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला याचा निश्चितच आनंद आहे. यापुढें वेकोली कडून किंवा कोणत्याही विभागाकडून शेतकऱ्याची हानी झाल्यास त्यांच्या हितार्थ आक्रमक राहील. आजवर हीच भुमिका घेऊन लढत आलो यापुढें ही शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढेल वेळप्रसंगी जेलवारी करायला ही तयार असेल
प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ