Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | सलगर खुर्द शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी


सलगर खुर्द ता मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत शूरवीर संभाजी करवर म्हणजे महाराष्ट्राला गवसलेले एक अनमोल रत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले सोनेरी एक रत्नच प्रतापगडाच्या लढाई वेळी अफजलखानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले विश्वासू १० अंगरक्षक निवडले होते. त्यापैकी १ मावळा म्हणजे शूरवीर संभाजी करवर यांनी प्रतापगडाच्या लढाईत आपले अतुलनीय पराक्रमाने इतिहासात नाव करून ठेवले अभिमान आहे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शूरवीर संभाजी करवर यांनी केलेल्या योगदानाचा पुढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रत्येक मोहिमेत शूरवीर संभाजी करवर हे पराक्रम गाजवत गेले आणि ते शेवटपर्यंत शिवाजी महाराजांची सावली बनून राहिले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माजी सरपंच सिद्धेश्वर भुसनर उपसरपंच अक्षय कटकर, सचिन खुळे,रावसाहेब कांबळे सर, ग्रामसेवक राहुल, शरद पाटील सर,तुकाराम पाटील, बंडू पाटील राजकुमार पाटील सर, सुनील दोडगे, सदाशिव बंडगर, दत्ता पाटील,तानाजी पाटील, गिरजाप्पा चोडे, विठ्ठल भुसनर, भागवत सोनवले आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies