एसटी महामंडळाचा अखेर कॅशलेस प्रवास सुरु..आता UPI द्वारे करता येणार आपल्या तिकिटाचे पेमेंट.
प्रतिनिधी(भानुदास गायकवाड)
आताच्या जमान्यात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. चहावाल्यापासून ते मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहक ऑनलाइन पैसे देतो. सर्व व्यवहारांत कॅशलेसवर भर देण्यात येत असताना एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकीट देण्याची सोय सुरू केली आहे,
देश डिजिटल होत असताना आपली एसटी कशी मागे राहणार , नागरिकना होणार त्रास व वाहकाना होणारा त्रास लक्षात घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेत क्यूआर कोड ची सुविधा चालू केली आहे , यामुळे प्रवासातील होणाऱ्या सुट्या पैश्याच्या वादाला आता पूर्ण विराम लागणार आहे ,
या निर्णयाचे सर्व स्तराहून स्वागत केले जात आहे एसटीमहसमंडळाच्या पुणें विभागातील सर्व आगाराणा याचे आदेश देण्यात आले आहेत,