Type Here to Get Search Results !

न्याय हक्कासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस बेमुदत संपावर १५ तारखेला धडकनार नागपुरात मोर्चा



मनोज गोरे /चंद्रपूर / प्रतिनिधी :-


महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती कोरपनाच्या वतीने विविध मागण्या घेत कोरपना तहसील कार्यालय कोरपणा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले.




दुष्काळसदृश्य तालुक्यात असलेल्या अंगणवाडीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांच्या प्रश्न सोडवावेत यासाठी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यात निवेदन दिले होते. परंतु त्यांच्या मागण्यावर कोणताही निर्णय न झाल्याने चार डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आपिला मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी. मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ ते २६ हजारापर्यंत करावे. मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी. अंगणवाड्यांसाठी किमान रु ५००० ते ८००० भाडे मंजूर करावे. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा.


या मागण्या केल्या. दि १५ नागपुरात ठीय्या आंदोलन करनार असल्याची माहिती गुजाबाई डोंगे, विमल जेनेकर,शोभा काकडे,कल्पना मोडक, प्रतिभा निब्रड, मंजुषा मालेकर, हेमलता जुमनाके, अर्चना काकडे संगीता टोंगे,वंदना मेघा लिपटे, प्रतिज्ञा टाले, यावेळी उपस्थित होत्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण करणार असल्याचे सांगितलेत यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad