Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत स्तरावरील विविध संघटनांच्या आंदोलनात कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग



ग्रामपंचायत स्तरावरील विविध संघटनांच्या आंदोलनात कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग

- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक असोसिएशनची माहिती



 मनोज गोरे कोरपणा तालुका प्रतिनिधी 


ग्रामपंचायत स्तरावरील विविध न्यायीक मागण्यांसाठी ग्रामपंायत स्तरावरील ग्रामसेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, ग्रा.पं. कर्मचारी संघटना आदींनी 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत कामबंद आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनात कोरपना तालुक्यातील ग्रामंचायतींचा सहभाग असून तिन दिवस कोणत्याही कामकाजात सहभागी होणार नाही, असा निर्णय ग्रामसेवक सरपंच असोसिएशनने कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून घेतला आहे.

ग्रामपंचायतती आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ व कराचंी परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन अनेक निर्णय घ्यावेत, आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, थकीत असलेला ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच, उपसरपंच मानधन अदा करावे, त्यात भरीव वाढ करावी, दरमहा न मागता मानधन देण्यात यावे, 100 टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विमा संरक्षण द्यावे, शासकीय कमिटीमध्ये स्थान देण्यात यावे, शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवास व्यवस्था व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा, शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे राज्याच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत, जिल्हा परिषदांमध्ये सरपंच कक्ष तर मुंबईत निवास व्यवस्था, वाचनालाय, काॅन्फरन्स हाॅल असे सरपंच भवन असावे, या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

निवेदन देतांना ग्रामसेवक असोसिएशनचे कोरपना तालुकाध्यक्ष रमाकांत गुरनुले सारिका धात्रक विलास चव्हाण शुभांगी ढवळे संजय तुरारे महेश मरापे विजय डांगे सतीश मळावी कडूजी तरारे मुस्ताक शेख संगेश शिंदे मंजुषा ढोरे गुंजा उईके आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies