Type Here to Get Search Results !

जांबुड येथे आयुष्यमान भाव: अभियान साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न



    आज दिनांक 30 डिसेंबर शनिवार रोजी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली "आयुष्मान भव:" आरोग्यविषयक विशेष मोहीम राबविणयात आली ह्या कार्यक्रमाअंतर्गत 18 वर्षावरील सर्व उपस्थित नागरीकांचे बी.पी तपासणी, शुगर तपासणी, सर्वांचे वजन, उंची करण्यात आली तसेच गरोदर मातांची आरोग्यतपासनी करण्यात आली .

आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत आलेले आयुष्मान कार्ड आभाकार्ड वाटप करण्यात आले व आयुष्यमान नवीन कार्ड तयार करून देण्यात आले. तसेच आयुष्यमान गोल्डन कार्डबद्दल सखोल माहिती देण्यात आली.

 शिबिरातील तपासणी केलेल्या लाभार्थ्यांची व संशयित रुग्णांची भविष्यात आपल्या पोर्टलवरील संकलित माहिती प्रशासन शासन दरबारी जमा होईल त्यामुळे जागृत होऊन सर्वांना ही माहिती देऊन सदर "आयुष्मान भव:" ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी जनजागृती व सर्व घटकातील लोकांपर्यंत हा संदेश देण्यात आला .

    ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल नाईकनवरे आरोग्य सेविका नीता सावंत , आरोग्यसेवक श्री. हरून शेख आशाताई बिले ,क्षीरसागर व परिसरातील ग्रामपंचायतीतील नागरिक आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad