Type Here to Get Search Results !

गाडगे बाबा! आम्हाला माफ करा-लोकचिंतन समितीने केला कथावाचक प्रदीप मिश्राचा जाहीर निषेध .



मागील तीन दिवसापासून कथावाचक प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण हा कार्यक्रम सुरू होता आणि तो आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केला होता.

पण या कथेमध्ये काही अश्या गोष्टी सांगितल्या गेल्या ज्यामुळे समजात अंधश्रद्धा पसरू शकते .




त्यासाठी लोकचिंतन समितीने कथावाचक प्रदीप मिश्रा यांचा गाडगे महाराज यांच्या मंदिरासमोर हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला .

त्यावेळी डॉक्टर तुषार देशमुख यांनी प्रतिनिधी सोबत आपली प्रतिक्रिया मांडली. 

 प्रदीप मिश्रा हे कथेतून लोकांना देव ,धर्म  , श्रद्धेच्या नावाखाली भ्रमित करत आहेत बेलपत्र शिवजीच्या पिंडीवर चिपकविल्याने मुले अभ्यास न करता पास होतात,  तसेच बेलपत्राच्या पूजेने कॅन्सर सारखा दुर्धर आजार बरा होतो अशी अवैज्ञानिक मुक्त फळे ते उधळीत आहे. त्यामुळे याला सामान्य भोळी जनता व विशेषता स्त्रिया बळी पडतात.

आपला अमरावती जिल्हा संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.

संत गाडगेबाबा ,वं. राष्ट्रसंत तसेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या वैचारिक परंपरेने समृद्ध आहे. देव धर्म आणि पूजा विधी मध्ये असलेल्या अंधश्रद्धेचा त्यांनी कळाळून विरोध केला होता. अशा या संतभूमीत एक टुकार भोंदू प्रदीप मिश्रा याने वातावरण गढूळ केले.




महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायदा संतांच्या विचारांनी मजबूत केला आहे. त्यामुळे प्रदीप मिश्रा यांची बेताल वक्तव्य

या कायद्याची पायमल्ली करणारे आहेत.

याबाबत आम्ही जाहीर निषेध करत असून श्री संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळी शांततामय लोकचिंतन करण्यासाठी एकत्र आलो होतो. यावर कार्यवाही करण्यासाठी तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुद्धा देण्यात आले .


प्रतिनिधी वैभव भुजाडे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad