Type Here to Get Search Results !

राज्य स्पर्धेसाठी संजय गांधी विद्यालय पेलोरा टेनिक्वाईट संघाची निवड



 कोरपना: ४७ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी विद्यालय पेलोरा मुलीचा संघाची निवड झाली आहे. उदगीर ( लातूर ) येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट टेनिक्वाईट स्पर्धेसाठी मुलींनी उंच भरारी घेतली सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहेत .

ही स्पर्धा २३ ते २५ डिसेंबर उदगीर, लातूर येथे होणार आहे या संघामध्ये कर्णधारपदी तनुश्री धानोरकर निवड करण्यात आली आहे.या संघात आचल तुरानकर , भाग्यश्री वांढरे, मार्गवी धागे, आचल दाते, योगिनी आडकिने या खेळाडूचा समावेश आहे.




तसेच संघ प्रशिक्षण म्हणुन संघमित्रा वाघमारे यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष - राजू वासेकर उपाध्यक्ष - बबन भोयर , संघटनेचे सचिव - राकेश ठावरी ,कोषाध्यक्ष - श्रीकृष्ण कोडापे , अजय जरीले , केतन ढासले, सोनाली कोरंगे, संजय गांधी विद्यालय पेल्लोरा मुख्याध्यापक संजय गाडगे, कन्नमवार, महेंद्र बोबडे सर,बामणे ,अमोल वडास्कर,संतोष तुरांनकर, शिवाजी इंग्लिश मिडयम स्कूल व ज्युनियर कॉलेज नांदाफाटा मुख्याध्यापक डिसुझा , रत्नाकर चटप सर, प्रमोद वाघाडे , प्रकाश उपरे यांनी खेळाडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी सुभेच्या दिल्या आहेत.


चंद्रपूर जिल्हा मनोज गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies