Type Here to Get Search Results !

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे साकारणार जिल्हा विज्ञान प्रदर्शनी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उदघाटन



  यवतमाळ जिल्हा प्रदर्शनीचे 51 वे जिल्हा प्रदर्शन राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले असून या जिल्हा विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन दिनांक 28/12/2023 रोज गुरूवारला संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. संजय राठोड पालक मंत्री यवतमाळ जिल्हा तथा मृद व जल संधारण मंत्री यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.वजाहत मिर्झा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड औरंगाबाद,मा.श्रीमती भावनाताई गवळी खासदार यवतमाळ वाशिम मतदार संघ, मा.हेमंत पाटील खासदार हिंगोली हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून अँड.निलय नाईक विधान परिषद सदस्य, मा. किरण नाईक विधान परिषद सदस्य, मा.धिरज लिंगाडे विधान परिषद सदस्य, मा. डॉ. अशोक उईके आमदार राळेगाव मतदार संघ, मा. मदन येरावार आमदार यवतमाळ,मा.संजीव रेड्डी बोदकुरवार आमदार वणी,मा. संदीप धुर्वे आमदार केळापूर, मा. नामदेवराव ससाणे, आमदार उमरखेड, मा.ईंद्रनिल नाईक आमदार पुसद, हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.श्री पंकज आशिया भा.प्र.से. जिल्हाधिकारी यवतमाळ,तर अतिथी म्हणून मा. डॉ.मेंनाक पोष मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ जिल्हा,मा.श्रीमती याशनी नागराजन सहा.जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी पांढरकवडा मा. डॉ.शिवलिंग पटवे ,शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती, डॉ .जयश्री राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, किशोर पागोरे शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग प्रदीप गोडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग डॉ प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ , डॉ.शिवानंद गुंडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, नीता गावंडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, सरला देवतळे गटशिक्षणाधिकारी राळेगाव योगेश डाफ सहायक शिक्षण उपनिरीक्षक जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक माध्यमिक, चित्तरंजन कोल्हे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक, आशिष कोल्हे उपाध्यक्ष , रोशन कोल्हे सचिव, प्राचार्य विलास निमरड हे राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून मा. दिलीपराव कोल्हे अध्यक्ष श्री लखाजी महाराज मंडळ झाडगाव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून तर बक्षीस वितरण समारंभ 29/12/2023 रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या विज्ञान प्रदर्शनीत जिल्ह्यातील अनेक नामवंत शाळा त्या शाळेचे बाल वैज्ञानिक या प्रदर्शनात प्रयोगाचे सादरीकरण करणार असून जिल्ह्यातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविण्यासाठी आणून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करांवा सोबतच ही विज्ञान प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असल्याने सर्वांनी प्रदर्शनीचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad