Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही



मोखाडा तालुक्यातील तिन शाळेंना माऊली ग्रुप व टाटा समूह यांच्या कडून टीव्ही भेट.

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम तालुका असून येथे आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात बऱ्याच घरांमध्ये व शाळेत स्मार्ट टीव्ही नसल्याने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे व शाळेत उपस्थिती वाढावी हा उद्देश डोळ्यासमोर धरून म्हणून माऊली ग्रुप डोंबिवली यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला असून प्रत्येक शाळेत स्मार्ट टीव्ही भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बनवता यावेत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व शैक्षणिक अभ्यासक्रम दाखवण्यासाठी महापुरुषांची इतिहास बघता यावा तसेच एका शिक्षकाची उणीव स्मार्ट टीव्ही भरून काढत असल्याने उपक्रम शहापूर व मोखाडा तालुका सुरू केला असून तिथे चांगल्या प्रकारे विद्यार्थी व शिक्षकांत प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत असल्याचे शाळेतील व्हिडिओ मधून समजले आहेत गावातील पालकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण झाले आहे. आतापर्यंत मोखाडा व शहापूर तालुक्यात 80 स्मार्ट टीव्ही वितरण करण्यात आले असून स्मार्ट टीव्ही काही लोक आपल्या मुलांचा वाढदिवस , लग्न, साध्या पद्धतीत साजरा करत शाळेला स्मार्ट देत असतात. मुकुंद टिलक सरांनी धोंड मारायची मेट व टाटा समूह यांकडून शिरसोनपाडा व काकडोशी येथे स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली. यावेळी संतोष बोंद्रे सर चारुदत्त कोळकर ,मुकुंद टिलक व टाटा समूहाचे टीम उपस्थित होती. तिनही गावातील ग्रामस्थांनी, शाळा व्यवस्थापन समिती यांनी माऊली ग्रुप वर टाटा समूह यांचे आभार मानले.

मोखाडा : सौरभ कामडी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad