Type Here to Get Search Results !

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सभासद मच्छिंद्र कृष्णा देशमुख यांनी १ एकरा मध्ये 111 मे .टन ऊस उत्पादन घेतले



विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या उद्दिष्ट शंभर टन योजनेअंतर्गत टेंभुर्णी येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र कृष्णा देशमुख यांनी प्रति एकरी 111 मे .टन ऊस उत्पादन घेतले. 117 गुंठ्यात 327 मे .टन ऊस उत्पादन घेतले.


कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबन दादा शिंदे यांच्या प्रेरणातून व जिल्हा दूध संघाचे चेअरमन माननीय रणजीतसिंह भैया शिंदे यांच्या मार्गदर्शनातून कारखान्याने मागील दोन वर्षापासून उद्दिष्ट शंभर टन योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या योजनेअंतर्गत निमगाव टे येथील शेतकरी *मच्छिंद्र कृष्णा देशमुख यांना कृषिरत्न डॉ. संजीव दादा माने, कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड यांनी मार्गदर्शन केले.


ऊस जात को 86032

लागण तारीख. 28.6.2022 

क्षेत्र 117 गुंठे

एकूण टनेज 327 मे. टन

एकरी 111 मे टन


ऊस तोडणी प्रसंगी हजर मान्यवर


कृषिरत्न डॉक्टर संजीव दादा माने, केन मॅनेजर - संभाजी थिटे, ऊस विकास अधिकारी-नारायण लगड, ॲग्रीओरसियर नलवडे , ऊस भूषण सोमनाथ हुलगे,बिट प्रमुख सलगर, क्षीरसागर ,शेतकरी मच्छिंद्र कृष्णा देशमुख


नियोजनाच्या ठळक बाबी


पूर्व मशागत, योग्य बेणे निवड व बेणे प्रक्रिया

सेद्रीय खताचा योग्य वापर

ऊस संजीवनी प्रमाणे रासायनिक खताचा बेसल डोस

ऊसाच्या पानावर फवारणी ऐकून पाच फवारण्या पैकी पाचवी फवारणी ड्रोन द्वारे व ठिबक द्वारे खताची मात्रा रोग व कीड निवारण पाण्याचे योग्य व्यवस्थापन.


याप्रसंगी केन मॅनेजर संभाजी थिटे यांनी शेतकऱ्याचे अभिनंदन केले व पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खोडवा पीक ठेवून त्यामध्ये पाचट आच्छादन करून व पाण्याचे योग्य नियोजन करून खोडव्याचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.


आवाहन


शेतकऱ्यांनी कारखान्याच्या उद्दिष्ट 100 मे . टन या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपले प्रति एकरी ऊस उत्पादन वाढवावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी केले


शेतकऱ्याचे मनोगत


विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू केलेली उद्दिष्ट 100 मे टन योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची आहे या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. - मच्छिंद्र कृष्णा देशमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad