मराठा समाजाला सरसकट आरक्षण नको, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार
सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये असे राष्ट्रवादी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले. ओबीसींच्या 375 गरीब जाती आहेत. कुणबी दाखले देऊन आरक्षण हडप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही. भुजबळांनी मंत्रिमंडळात राहून संघर्ष करावा आम्ही बाहेर राहून संघर्ष करू. दिवाळी संपली की राज्यभर ओबीसी भटके विमुक्त रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहेत असे शेंडगे म्हणाले.