मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेते तोडगा काढणार?
तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली असून बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. तसेच मनसेपासून ते जनता दल, रासप आणि माकपलाही बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.