Type Here to Get Search Results !

सह्याद्री परिसर शेतकरी संस्थेच्या वतीने ३५ शेक्सन बाधित व इको झोन बाधित शेतकरी संघाचा मेळावा संपन्न



सह्याद्री परिसर शेतकरी संस्थेच्या वतीने ३५ शेक्सन बाधित व इको झोन बाधित शेतकरी संघाचा मेळावा संपन्न

 

 सह्याद्री परिसर शेतकरी सेवा संस्थेच्या वतीने आज दि. ०४/११/२०२३ रोजी शहापूर येथे म.ना.बरोरा माध्यमिक विद्यालय हाॅल येथे ३५ सेक्शन बाधित व इको सेन्सिटिव्ह झोन बाधित शेतकरी वर्गाचा मेळावा आयोजित केला होता. 




सदर मेळाव्यास शहापूर, मुरबाड, भिवंडी व वाडा तालुक्यातून मोठ्या संख्यने शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी सह्याद्री परिसर शेतकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.किशोर ठाकरे साहेब (Retd.CF  IFS) तसेच उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत शेळके साहेब (Retd. DFO MFS) व सचिव मा. ऍड श्री.राहुल ठाकरे, संस्थेचे कार्यकारी मंडळातील श्री.मनोहर ठाकरे, श्री.विवेक निमसे, श्री.पी.जी. जाधव, श्री. सुरेश बी. पाटील त्याचबरोबर शहापुर येथील मा. श्री.गणपत विशे याच्या विशेष प्रयत्नांनी सदर शेतकरी मेळावा आयोजित केला होता. 


सदर मेळाव्यात खाजगी वनांचे प्रश्न, पारंपारिक वन निवासी यांचे वन हक्क, मा. सर्वोच्य व उच्च न्यायालयांच्या न्यायनिर्णयाने महाराष्ट्र शासनाला ३५ सेक्शन बाधित वने विषयक प्रकरणांत पॉलिसी जाहीर करून शासन निर्णय जाहीर करण्यास सांगितलेल्याबाबत विस्तृत चर्चा झाली. 


उपस्थित बाधित शेतकरी यांनी आपल्या व्यथा मांडल्या त्यावर मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. यानंतर मा. श्री. मोहन पाटील यांनी संस्थेच्या वतीने शेतकरी वर्गासाठी कोणते स्वरूपाची कामे केली जातील तसेच शासनाला याबाबत काय पाठपुरावा करणार याबाबत विचारणा केल्यानंतर यावेळी ऍड श्री राहुल ठाकरे यांनी सांगितले की, बाधित शेतकरी वर्गाच्या वतीने सदर सर्व प्रकरणांत मा. मुख्यमंत्री व मा. वन मंत्री यांना बाधित शेतकरी यांच्या वतीने संस्थेतर्फे एक आठवड्याच्या आत निवेदन देऊन बाधितांना न्याय देणेबाबत विनंती करणार आहोत. तसेच मा. न्यायालयांच्या निर्देशाप्रमाणे शासनाने बाधित शेतकऱ्यांच्या ३५ सेक्शन बाधित वने व महाराष्ट्र शासन तसेच वनेत्तर कामास बंदी असे शेरे काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करणार आहोत. याबाबत शासन अपयशी ठरले असून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी महाराष्ट्र शासना विरोधी अवमान याचिका दाखल करणार आहोत, असे निर्णय घेण्यात आले. 


सदर बाधित शेतकरी वर्गाच्या न्यायासाठी तालुका स्तरावर सह्याद्री शेतकरी समन्वय समिती स्थापन करून त्यांना न्याय देण्यासाठी,लढा उभारणे करिता कार्यरत राहणे याबाबत ठराव करण्यात आला.शेवटी सर्वांचे आभार मानून सभा संपविण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad