Type Here to Get Search Results !

दहीवली कुंभिस्ते येथे श्रमदानातून बांधला वनराई बंधारा.



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डाहे दहिवली कुंभिस्ते अंतर्गत येत असलेल्या दहिवली कुंभिस्ते मलावकर पाडा येथे ग्रामस्थांच्या सहाय्याने माती व सिमेंट पिशव्यांच्या आधारे वनराई बंधारा बांधण्यात आला आहे . त्यातून साठणाऱ्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांना फुलशेती ,भाजीपाला व जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात.

ग्रामीण भागात पाण्याची कमतरता असल्याने पावसाळ्यानंतर वाहणाऱ्या पाणी वनरई बंधारे बांधून , पाणी अडवून ते पाणी शेतीसाठी वापरणे व भूजल साठा वाढवणे हा या वनराई बंधारे बांधण्या मागचा उद्देश आहे. यासाठी तालुका कृषी विभाग यांच्या संकल्पनेतून व कृषी सहाय्यक 

श्री.सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवली कुंभिस्ते (मलावकर पाडा) येथे वनराई बंधारा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने व श्रमदानाने बंधारा बांधण्यात आला .यावेळी गावचे सरपंच सौ वृषाली पाचलकर ,उपसरपंच सौ संजीवनी फडवले ,ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक लहांगे ,श्री हरिश्चंद्र बरतड ,सौ वैष्णवी मलावकर ,सौ सपना सापटा व श तरुण शेतकरी वर्ग ,महिला शेतकरी वर्ग यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यासाठी सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad