Type Here to Get Search Results !

जांभूळ विहीर भागाकडे जाणारा खड्डा ठरतोय जीवघेणा, ग्रामपंचायत रायतळेचे अक्षम्य दुर्लक्ष



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


जव्हार तालुक्यातील सर्वाधिक आर्थिक उत्पन्न असलेल्या रायतळे ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळविहीर पुर्व व पश्चिम हा रहिवासी भाग जव्हार नगरपरिषद हद्दीला लागून आहे ,सदरच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जांभुळविहिर पूर्व व पश्चिम भागात ५०० ते ६०० घरे आहेत.

जव्हार शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून जांभूळ विहीर उदयास आली होती मात्र नियोजन रायतळे ग्रामपंचायतच्या शून्य कारभारामुळे जांभुळविहीर भागाला  समस्यांनी ग्रासले आहे आहे 

काही महिन्यांपूर्वी रायतळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती यामध्ये विजय होणाऱ्या  सदस्य व सरपंचांनी मोठ्या प्रमाणात आश्वासनाचा पाऊस पाडला होता मात्र आता सर्वांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.

जव्हार-सेल्वास महामार्गावरील पारस हॉटेल बस स्टॉप जवळ जांभुळ येथील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या  पश्चिम भागाकडे जाणाऱ्या वळणावर जीवघेणे खड्डे झाले  आहेत.

जांभुळ भागातील पाणीटंचाई नष्ट होण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन सहाणे यांच्या प्रयत्नाने पाण्याची लाईन टाकण्यात आली होती.

लाईन टाकतेवेळी रस्ता खोदण्यात आला होता. सदर रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी ग्राम पंचायतीची होती मात्र कित्येक महिन्यापासून ग्राम पंचायतीकडे मागणी करुन ही रस्ता दुरूस्त होत नसल्याने नागरिक आता आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रशासन व सरपंच आणि सदस्य यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याने विकासाचा गाडा थांबल्याचे दिसून येते. 

सदर रस्ता दुरूस्त करण्यासाठी खुप वेळा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक यांना विनंती केली आहे मात्र ते दखल घेत नसल्याने आता सर्व नागरिकांना घेऊन जव्हार पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येणार आहे


- गजानन सहाणे 

माजी ग्रामपंचायत सदस्य , रायतळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad