चांदवड : येथील पुरातन डोंगरावरील कालिका माता मंदिरात सोमवारी (दि. १६) पुनः प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथे नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. गुहेतील कालिकादेवीची मूर्ती चतुर्भुज असून, आसनस्थ आहे. प्राचीन असल्यामुळे मूर्तीची झीज झाली होती. मूर्तीचे वज्रलेपन पुणे येथील प्रसिद्ध मूर्ती कारागीर विशाल ओस्तवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. अमोल दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे पौरोहित्य होणार आहे. भाविकांनी मदत करावी, असे आवाहन मंदिराचे सुशांतपुरी गोसावी, गोसावी कुटुंबीय व मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे