Type Here to Get Search Results !

शालेय नाशिक ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न



नाशिक  जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने 14 ,17 ,19 वर्षातील नाशिक ग्रामीण शालेय जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली.




जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा आधिकारी अजिंक्य दुधारे भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव मीनाक्षी गिरी ,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड व सहसचिव धनु लोखंडे खेळाडू व क्रीडा शिक्षक उपस्थित होते




जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक ग्रामीण मधून मुलांचे व मुलींचे ऐकून 39 संघ उपस्थित होते नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व टेनिस क्रिकेट खेळाचे नियम सांगितले .




शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा या तीन दिवसीय होत्या यामध्ये 14 वर्षेआतील संघांमध्ये प्रथम क्रमांक गोल्डन डे युनिव्हर्सल स्कुल,द्वितीय क्रमांक के.के .वाघ इंग्लिश स्कूल काकासाहेब नगर,तृतीय क्रमांक सेट व्हिन्सेंट पल्लोत्ती स्कुल,मुलीमध्ये प्रथम क्रमांक: योगेश्वर विद्यालय दावचवाडी,द्वितीय क्रमांक :सरस्वती विद्यालय निफाड यांनी मिळवला तसेच 17 वर्षातील संघांमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक : ग्लोबल इंटरनॅशनल स्कुल,द्वितीय क्रमांक के.आर .टि.माध्यमिक मौजे.सुकेणे,तृतीय क्रमांक ;-वैनतेय विद्यालय निफाड मुलींमध्ये प्रथम क्रमांक: ग्लोबल इंटरनॅशनल स्कुल

द्वितीय क्रमांक -के.के .वाघ इंग्लिश स्कूल

काकासाहेब नगर तसेच 19 वर्षातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक: क.ग.दा.मोरे कला.वाणिज्य व सायन्स महाविद्यालय निफाड,द्वितीय क्रमांक -आत्मा मलिक इंग्लिश मेडियम गुरूकुल पुरणगांव, तृतीय क्रमांक वैनतेय विद्यालय व ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स निफाड,मुलींमध्ये प्रथम क्रमांक- क.ग.दा.मोरे महाविद्यालय कला.वाणिज्य व सायन्स महाविद्यालय निफाड यांनी मिळाला




या सर्व खेळाडूंची संघांची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मीनाक्षी गिरी,विलास गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,सहसचिव धनु भाऊ लोखंडे यांनी सर्वांनी अभिनंदन केले . व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पंच म्हणून धनु लोखंडे , सत्यम पाडे ,विवेक चितोडीया,मोहित पोके,प्रतिक्षा कोटकर यांनी काम बघितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad