Type Here to Get Search Results !

शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा भरघोस प्रतिसाद



            क्रीडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती अमरावती टेनिस क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 9 10 11 ऑक्टोंबर रोजी करण्यात आलेले होते. या स्पर्धा अनुक्रमे 14 वर्षे 17 वर्षे 19 वर्षे वयोगट मुले व मुली याप्रमाणे खेळवल्या गेल्या. शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेला जिल्हास्तरावर ग्रामीण स्तरावर भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला.




जवळपास 60 संघांनी यामध्ये सहभाग नोंदविलेला होता. सामन्यांचे आयोजन तीन ग्राउंडवर करण्यात आलेले होते. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आमच्या मार्गदर्शिका मीनाक्षी गिरी मॅडम तसेच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.




अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, अमरावती जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष माजी महापौर विलास भाऊ इंगोले, त्यांचे सहकार्य लाभले. अमरावती जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव नितीन सराफ, सर्व पदाधिकारी यांचे सर्व खेळाडूंनी मनापासून अभिनंदन केले.




जिल्हा क्रीडाअधिकारी गणेश जाधव सर यांनी सर्व विजेत्या संघांना पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad