Type Here to Get Search Results !

नंदुरबार | शालेय जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन



नंदुरबार - नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. या स्पर्धेत मुले व मुलींच्या खेळाडूंच्या एकूण ३५ संघांनी सहभाग नोंदविला.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व चावरा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार यांच्यातर्फे नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संतोष वसईकर, राज चौधरी, सुभाष पानपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चावरा इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक फादर टेनि फरक्का हे होते. या जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत १४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात झाल्या असून एकूण ३५ संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेच्या पंच म्हणून तन्मय शहा, वैभव मराठे, यश विसपुते, सौरभ गवळी, मुकेश गायकवाड, जवाहर पवार यांनी केले. सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले. आभार दिनेश बैसाणे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव संदीप खलाणे, हर्षबोध बैसाणे, योगेश निकुंभ, योगेश मोरे, मनोज वसईकर, विजय जगताप, नंदू पाटील, जगदीश वंजारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad