Type Here to Get Search Results !

शिव अविष्कार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त नवदुर्गांचा सन्मान.



शिव अविष्कार स्पोर्ट फाउंडेशन व क्रीडा सह्याद्री ,यांच्या वतीने शारदीय नवरात्र निमित्त क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या नवदुर्गांचा सन्मान सोहळा सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य माजी मधुकर माळी ,स्वामी आयुर्वेदा आणि कृषी केंद्राचे संचालक सुनील आंधळे कार्यक्रमाचे अध्यक्ष निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलालजी चोरडिया,सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत, शिव आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष विलास गायकवाड,श्याम चौधरी, रमेश वडघुले ,दत्तू रायते, धनु लोखंडे ,भूषण निकम आदि मान्यवर उपस्थित होते. 




          या सोहळ्याप्रसंगी निकिता शंकर राजोळे ,श्रावणी रवींद्र कोटकर , वैष्णवी मंगेश लगडे, श्रावस्ती दीपक गांगुर्डे , स्नेहल संजय काळे ,मिजबा अकबर मुलानी, रेणुका नितीन सोनवणे,गायत्री रंगनाथ सोनवणे,करिष्मा संतोष सानप,दुर्गा दिलीप गुंजाळ,आर्या शिवनाथ जाधव क्षितिजा परशराम ठाकरे,शीला संजय कडाळे,आश्लेषा ज्ञानेश्वर वडघुले, वेदश्री शरद पाटील,श्रद्धा अजित इंगोले, कृतिका मोहन पाटील, श्रद्धा किशोर सूर्यवंशी,जानवी मोतीराम जाधव, मृण्मयी दिनानाथ हाके,दिशा शरद कदम,धनश्री मंगेश काकड , सिद्धी सचिन गवळी,ऋतुजा परशराम बोराडे,श्रद्धा राजेंद्र उपाध्ये,अनुष्का कैलास उगले,जयश्री भगवान गावित, समृद्धी संजय चव्हाण,ऋतुजा अनिल जोगदंड,जान्हवी अतुल राठी,खुशी संजय लुक्कड, कांचन साहेबराव पगार,गायत्री सुभाष निफाडे ,वृषाली रवींद्र निफाडे,पूजा रतन पवार, जयश्री पंढरीनाथ जेऊघाले,वेदिका अशोक कुयटे,अनन्या दुशांत कराड , मृणाल भरत मोहिते यांना सन्मानचिन्ह,गौरवपदक,मानाचा फेटा अशा स्वरूपात मान्यवरच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदलालजी चोरडिया यांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्राबद्दल मार्गदर्शन केले व महत्व पटवून दिले.




" स्त्री हे आदिशक्तीचे एक रूप आहे. तिच्या डोकावून पाहिले तर अफाट शक्ती आहे, त्यामुळे तिच्या आयुष्यात कितीही कसोटीचे, दुःखाचे प्रसंग आले तरी ते चटकन सावरणारी, खंबीरपणे उभी राहणारी ही ती स्त्रीच असते" असे मत शिव अविष्कार स्पोर्ट्स फाउंडेशनचे व क्रीडा सह्याद्री ,नाशिक टेनिस क्रिकेट सचिव अध्यक्ष विलास गायकवाड यांनी व्यक्त केले.




             सदर कार्यक्रमासाठी निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलालजी चोरडिया, सरस्वती विद्यालयचे चेअरमन प्रवीण कराड, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत निशिगंधा शिंपी, वैशाली काळे, प्रतिभा महाजन, सविता गुंजाळ,ज्योती सांगळे, अश्विनी गांगुर्डे, शारदा काजळकर, छाया चव्हाण, निलम बेंडकुळे, क्रीडाशिक्षिका प्रतिक्षा कोटकर ,कीर्ती कोटकर,आयान शेख, सुमेध बोदडे ,सार्थक कर्डिले,समर्थ निकम,आदिनाथ खंडारे,कार्तिक मोरे आदि शिक्षिका व पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी निलम बेंडकुळे यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमाचे आभार विलास गायकवाड यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad