Type Here to Get Search Results !

हिंदू वाल्मिकी सेवा संघ डोंबिवली आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी



संदीप उर्फ राजा वाल्मिकी यांनी मानले कोकण प्रांत मंत्री उद्धवरावजी खराडे यांचे आभार 


कल्याण डोंबिवली प्रतिनिधी लक्ष्मण पवार 

 

सालाबाद प्रमाणे याही वर्षी हिंदू वाल्मिकी सेवा संघ डोंबिवली आयोजित वाल्मिकी समाजाच्या वतीने महान संत कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली 

 

यावेळी डोंबिवली शहरातून रामायणाचे रचेता महर्षी वाल्मिकी यांची अश्व रथाने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून वाल्मिकी समाज हॉल येथे सांगता करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक राजेश मोरे यांनी वाल्मिकी समाजाला मार्गदर्शन करून कोणत्याही उपक्रमासाठी आम्ही तत्पर असून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले 

 

 

या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद कोकण गोवा प्रदेश महामंत्री उद्धवरावजी खराडे, रवी कुमार बहरवाल राष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांत उपाध्यक्ष, भरत आडे राष्ट्रीय छात्र कोकण प्रांत उपाध्यक्ष, संगीता शेट्टी राष्ट्रीय महिला परिषद ठाणे विभाग उपाध्यक्ष ,चंद्रभान मोरया राष्ट्रीय बजरंग दल ठाणे विभाग संघटन मंत्री, योगेश शिंदे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ,धर्मराज राजपूत नवी मुंबई सोशल मीडिया उपाध्यक्ष, अमोल कांबळे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, ऋषिकेश गायकवाड आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नेरूळ विभाग आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दलाचे डोंबिवली शहराध्यक्ष संदीप उर्फ राजा वाल्मिकी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानून स्वागत केले  

 

हा जयंती महोत्सव कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी हिंदू वाल्मिकी सेवा संघाचे बबलू वाल्मीकी, बघू भाई चव्हाण ,लाला वाल्मिकी, वीर सिंग वाल्मिकी सचिन बैनवाल, करण वाल्मिकी या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies