Type Here to Get Search Results !

कर्जाला कंटाळून कडोली यतील शेतकऱ्याची आत्महत्या



कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे


कोरपणा तालुक्यातील कडोली येथील रहिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. मृत शेतकरी पुरुषोत्तम धोंडू वडस्कर यांनी स्व:ताच्या घरीच विषप्राशन केले. दरम्यान, त्यांना तत्काळ उपचारासाठी गडचंदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्या रुग्णाला चंद्रपूर येथे हलविण्यात आलेत परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. येथील कडोली या गावात राहणारे या 55 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम वडस्कर यांच्याकडे शेती असून, त्यांच्या उपजीविकेचे शेती हे एकमेव साधन होते. मात्र शेतीवर उपजीविका भागत नसल्याने ते रोजंदारी सुध्या करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, तसेच शेतीवर घेतलेले बँक,सोसायटी, बचत गट व अन्य स्वरूपातील कर्ज फेडण्यात अपयश येत असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे वडस्कर शेतकरी हे चिंताग्रस्त झाले होते.घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कुठलीच शक्यता डोळ्यासमोर दिसत नाही, हाती येणारे उत्पन्न अत्यंत कमी, शेती उत्पादनांना भाव नाही, अशी अनेक संकट समोर असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त झाले होते.अखेर हताश होऊन त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गावात एका कष्टकरी शेतकऱ्यांची अशा पद्धतीने आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकरी पुरुषोत्तम वळस्कर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies