Type Here to Get Search Results !

कत्तलखान्यात नेणाऱ्या गुरांची सुटका



जव्हार :-सोमनाथ टोकरे                                  


जव्हार,दि.३ ऑक्टोंबर २३रोजी 

जव्हार तालुक्यातील वडोली चिर्याचापाडा या ठिकाणी ग्रामस्थांनी गुरे घेऊन जाणारा ट्रक पकडला व त्यातील २५ गुरांची सुटका केली.

 महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असताना देखील मोठ्या प्रमाणावर गुरे कत्तलखान्यात नेली जात आहेत. ही गुरे खेड्यापाड्यातून चोरून नेण्यासाठी तस्करांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.




 गोहत्या बंदी असताना देखील हे तस्कर बिनधास्तपणे कतलीसाठी गुरे कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावयास मिळत आहे.पालघर जिल्ह्यात कतलीसाठी गुरे नेताना मागील वर्षभरात अनेक पोलीस कारवाया झाल्या आहेत, परंतु हे तस्कर दोनच दिवसात जामीनावर सुटत असल्यामुळे यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. आज दिनांक ३ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता वडोली पैकी चिऱ्याचा पाडा या ठिकाणी २५ गुरे भरलेला ट्रक क्रमांक MH12 MV 9414 ही संशयास्पद उभी होती. ग्रामस्थांना संशय आल्याने त्या ट्रक मध्ये बघितल्यावर त्यामध्ये गुरे भरलेली होती. सदर ट्रक ग्रामस्थांनी थांबवला व गुरे उतरविण्यास सांगितले , त्यावेळी आत बसलेले दोन इसम पळून गेले मात्र रस्त्याला अडथळा निर्माण केल्यामुळे ट्रक पळवुन नेता आला नाही त्यामुळे ट्रक चालक हुसेन शेख, रा. घोटी हा ग्रामस्थांच्या हाती लागला, ग्रामस्थांनी जव्हार पोलिसांना संपर्क करून हुसेन शेख याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याबाबत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिघोळे हे अधिक तपास करीत आहे. सदर गुरे ही भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील गोशाळेमध्ये नेण्यात आली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad