Type Here to Get Search Results !

नवोपक्रमशील शिक्षिका सौ. संगिता बाजीराव ठूबे यांच्या संपर्कातून जि.प.शाळा गोळवली शाळेतील विद्यार्थ्यांना लेखनासाठी उपयुक्त पॕड व प्रिंटर भेट...



डोंबिवली (भानुदास गायकवाड)


              देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हातच घ्यावे... या मूल्याचा संस्कार नकळतपणे आज जि. प.शाळा गोळवली केंद्र - सोनारपाडा, ता - कल्याण ,जि - ठाणे येथील विद्यार्थ्यांमध्ये रुजवता आला. निमित्त होते "उभारी फाउंडेशन - ठाणे" ह्या समाजसेवी संस्थेचे. शाळेतील शिक्षिका सौ. संगिता बाजिराव ठूबे यांच्या प्रयत्नाने उभारी फाउंडेशन - ठाणे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रज्ञाजी मांगले,महेशजी पारेकर, संकेतजी सोमणे, रुपालीजी केरी, प्रकाशजी वाडवे, वंदनाजी कोळंबकर यांनी शाळेतील एकूण ८२ विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरसाठी आवश्यक असलेले लेखन साहित्य पॅड तसेच शाळेसाठी अत्यंत गरजेची असलेली वस्तू "प्रिंटर" उपलब्ध करून दिले.

     कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीदेवी आणि मुलींच्या शिक्षणाची ज्योत ज्यांनी पेटवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आलेल्या पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली.

तदनंतर शाळेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सर्व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले. 

       सदरच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या निमंत्रणाचा मान राखून शाळा सुधार समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश दादा गायकवाड, श्री. दिपक दादा गायकवाड - उपाध्यक्ष ,सौ. कल्पनाताई पाटील - सचिव तर कोषाध्यक्ष व शिक्षणप्रेमी श्री. रामा काका म्हात्रे, सहसचिव सौ. मनीषाताई पाटील, श्री.राजूदादा जाधव, सदस्य श्री. सिद्धार्थजी चिलवंत, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रुकसानाजी अन्सारी मॅडम , सौ. मिनाक्षी ताई जाधव (पालक) सौ.नंदाताई गायकर - मदतनीस आणि स्टार कॉलनी डोंबिवली येथून आलेले पाहुणे श्री.गंधारजी कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी उभारी फाउंडेशनने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व बोलके विद्यार्थी पाहून शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले.विद्यार्थ्यांनी कृतियुक्त इंग्रजी कविता तसेच इंग्रजी संभाषणाने पाहुण्यांचे मन जिंकले. शाळा सुधार समितीचे उपाध्यक्ष श्री. दिपक दादा गायकवाड यांनी याप्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ.संगीता ठूबे मॅडमचे विशेष कौतुक केले. विद्यार्थी प्रगती व कार्यक्रमाचे सुंदर आयोजन पाहून समाधान व्यक्त केले. 

      कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन सौ. संगिता ठूबे मॅडम यांनी केले. सौ.बोरकर मॅडम यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी शाळेचे मुख्या.श्री. नटराज मोरे सरांनी लिलया पेलली.             

       विशेष म्हणजे उभारी फाउंडेशनच्या सर्व टीमने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबत बसून शाळेच्या पोषण आहाराची चव चाखली. उपस्थितांना शाळा सुधार समितीच्यावतीने चहापाणी व नाश्ता देऊन कार्यक्रमाची गोड सांगता झाली.

     सदरच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण तर झालेच पण विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत उभारी फाउंडेशनचे योगदान मोलाचे ठरणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे शतशः आभार मानले व त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies