Type Here to Get Search Results !

मातोश्री येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये उद्धव साहेबांना उद्धव ठाकरे यांची तैल प्रतिमा भेट देताना कोरपणा तालुका प्रमुख डॉ. प्रकाश खनके



कोरपणा प्रतिनिधी मनोज गोरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची मुंबई येथे चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी ते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी पर्यंत सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये कोरपणा तालुक्यातून तालुकाप्रमुख डॉक्टर प्रकाश ख नके यांनी या बैठकीत उपस्थिती दर्शविले विशेष चंद्रपूर जिल्हा आदिवासी दुर्गम जिल्हा असून या जिल्ह्यात बांबू पासून बनवलेल्या अनेक वस्तू विक्री मोठ्या प्रमाणात होत असतात चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये बांबूपासून बनलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा बनवून प्रकाश खनके यांनी त्या बैठकीत उद्धव साहेबांना प्रतिमा बांबू पासून बनवलेली सप्रेम भेट दिली




या वेळी उद्धव साहेब चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका प्रमुखांचे कौतुक केले एवढेच नव्हे तर बांबू पासून प्रतिमा बनवणाऱ्या व्यक्तींचा नंबर घेऊन दूरध्वनीद्वारे त्या व्यक्तीसोबत उद्धव साहेबांनी संभाषण केलेत व त्या कारागिराचे सुद्धा अभिनंदन केले,आपल्या तालुक्यात शिवसेना वाढवावे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा आपल्या निवडून येतील याकरिता राजुरा विधानसभेमध्ये सभा घेऊन येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना विधानसभा लोकसभेमध्ये उमेदवार जास्तीत जास्त कसे जिंकता येतील या उदातीतूने प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेत राजुरा शहरांमध्ये सभा लावून येण्याचं अभिवचन खनके यांना उद्धव साहेबांनी दिले. कोरपना शहराध्यक्ष मोबिन बेग आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोरपणा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा त्यांनी विशेष या कार्यकर्ता बैठकीत उल्लेख केला या झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies