Type Here to Get Search Results !

कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक - विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने



 मुंबई ( भानुदास गायकवाड)


मुंबई, दि. 16 : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये कीटकनाशके साठा व विक्री व घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक असल्याची माहिती, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

श्री. माने यांनी म्हटले आहे की, विक्रेते घरगुती कीटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट, बझार इत्यादी) विना परवाना व्यवसाय करीत आहेत. केंद्र सरकारच्या कीटकनाशके कायदा 1968 कीटकनाशके नियम 1971 अन्वये कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ) घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. घरगुती कीटकनाशके साठा व विक्रीचे परवाने कीटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. या परवान्यांमधील उगम प्रमाणपत्रे व्यपगत झाल्यास परवान्यामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधित कीटकनाशके (Restricted Insecticides) वापरासाठी (Fumigation service) परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणं कीटकनाशके अधिनियम 1971 चा नियम 10 चे उल्लंघन आहे.

विनापरवाना किटकनाशकं, घरगुती वापरासाठीची (उदा. झुरळ, उंदीर, ढेकूण, मच्छर, डास, मुंग्या इत्यादी नियंत्रण) कीटकनाशकांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी कीटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरीत घ्यावेत व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी रोड नं. १६. झेड लेन, बागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम) ४००६०४, संपर्क क्रमांक – ८६९१०५८०९४ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies