Type Here to Get Search Results !

वाचन प्रेरणा दिना निमित्त ग्रंथभेट प्रदर्शनाचे आयोजन .



घोडेगाव 

दिनांक 15/10/2023

भारतरत्न डॉ . ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून यशवंतराव चव्हाण माध्यमिक विदयालय आंबेगाव वसाहत येथे साजरी करण्यात आली . डॉ . ए पि जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर व ग्रंथालय विभाग प्रमुख वंदना मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .




या प्रसंगी भारतरत्न डॉ. ए.पि. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा प्रवास वंदना मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना अवगत केला . वाचन प्रेरणा दिना निमित्त विद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनास विद्यालयातील् 300 विद्यार्थ्यांनी भेट देऊन वाचन योग्य पुस्तकांची माहिती घेतली. ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व विधार्यांनी एका पुस्तकाचे वाचन केले . सर्व शिक्षकांनी मला भावलेल्या पुस्तकाचा सारांश मुलांना समजावून सांगीतला . 




ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन शिक्षक वैभव गायकवाड , माणिक हुले , गौरी विसावे , निलम लोहकरे ,राधिका शेटे , यांनी केले .सूत्रसंचलन संजय वळसे यांनी व आभार वैशाली काळे यांनी मानले.




प्रतिनीधि आकाश भालेराव

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad