पन्हाळा केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा आयोजित केला आहे. स्वच्छता उपक्रमात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक चेतनकुमार माळी यांनी केले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ ऑक्टोबरपासून स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने १ ऑक्टोबर रोजी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.