Type Here to Get Search Results !

विलास रामा गावंढा यांना जव्हार तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानी सन्मानित




जव्हार :-सोमनाथ टोकरे 


दि १३ सप्टेंबर २०२३ रोजी विलास गावंढा सर जिल्हा परिषद  शाळा काळशेती ता. जव्हार जिल्हा पालघर जव्हार तालुकास्तरीय  पंचायत समिती जव्हार शिक्षण विभाग अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्काराने यथोचित सन्मान  करण्यात आला. विलास  गावढा यांनी  १७ वर्ष एक  उपक्रमशील शिक्षक  म्हणून शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल  १३  सप्टेंबर रोजी  हा हा पुरस्कार प्रकाश निकम अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर , जव्हार पंचायत समिती सभापती  विजयताई लाहारे, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती जव्हार, गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार, उपसभापती  दिलीप पाडवी, माजी सभापती चंद्रकांत रंधा,यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  

    शाळा स्तरावर त्यांनी शाळाबाह्य   मुलांना  प्रवाहात  आणणे, मराठी भाषा जतन संवर्धनासाठी  कविता लेखक, आदिवासी भाषा संवर्धन निमितपणे योगाभ्यास, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, वाचन लेखन उपक्रम  सांस्कृतिक कार्यक्रम  महापुरुषांच्या जयंती  रांगोळी स्पर्धा असे विविध प्रभावीपणे राबवण्यात पुढाकार घेऊन  साले गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत,जव्हार तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेतील  विविध शाळेतील  शिक्षकांना आदर्श शिक्षकानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .नोकरी लागल्याची तारीख २००४ नांदगाव २००६  दखण्याचा पाडा प्रतिनियुक्तीवर  अति दुर्गम भागात  काम केले. कुरलोड ते दखण्याचा पाडा १२ते १३ किमी एका बाजूने प्रवासम्हणजे रोज २५ किमी अंतर पायी प्रवास करत अध्यापनाचे कार्य केले.

नंतर पुन्हा नांदगाव येथे कार्यरत असताना त्यांचा वर्गातील जवळ ३ते ४ विध्यार्थी आता सरकारी नोकरी करत आहेत. व बाकी प्रायव्हेट कंपनीत चांगल्या पदावर जॉब करतातत्यानंतर २०१३ पासून जि प शाळा काळ शेती येथे कार्यरत विविध शैक्षणिक उपक्रम निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा सूर्यनमस्कार स्पर्धा धावणे पोहण्याच्या स्पर्धा कवायत योगासने  परिसर सहल क्षेत्रभेट वृक्षारोपण स्वच्छता मोहीम समाज जनजागृती सारखे कार्यक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड काळात रक्तदान यासारखे उपक्रम राबविण्यात आले . त्याचबरोबर विविध नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी रक्षाबंधन ,शिक्षक दिन, विविध उपक्रम, भाषण स्पर्धा गायन स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धेमध्येविद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता दर्जा उंचविण्यासाठी विविध उपक्रम विशेषता इंग्लिश व गणित या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी व गणिताची भीती नाहीशी करण्यासाठी विशेष प्रयत्न यापुढे चांगले विद्यार्थी घडवण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असणार  हा पुरस्कार माझ्या कामाची पोचपावती म्हणून आहे.  सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये प्रामाणिकपणे  मुला मुलींना जर शिकवले  तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले विद्यार्थी घडतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad