Type Here to Get Search Results !

मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य संग्रामाचा धगधगता इतिहास सांगणारे नाटक "गाथा मुक्तिसंग्रामाची" यशस्वीपणे सादर



किनवट प्रतिनिधी विशाल भालेराव


किनवट : रविवारी (ता. 24) सायंकाळी 6.30 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानित्त गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व संचालनालय निर्मित मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य संग्रामाचा धगधगता इतिहास सांगणारे नाटक  "गाथा मुक्तिसंग्रामाची" यशस्वीपणे सादर करण्यात आले.

         आमदार भीमराव केराम यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांचे प्रतिमेस पुष्पार्पूण प्रयोगास प्रारंभ झाला. यावेळी आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, पीएम पोषण अधिक्षक अनिल महामुने, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके यांची मंचावर उपस्थिती होती.

         याप्रसंगी स्वातंत्र्यसेनानीचे वारसदार श्रीमती मुक्ताबाई निवृत्ती सावते, निवृत्त तहसिलदार उत्तमराव कागणे व प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ, मराठवाडा मुक्तिसंग्रामावर कवन रचनारे आद्यशाहीर दिवाकर निटूरकर, डाॅ. मार्तंड कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाटकाचे दिग्दर्शक व समन्वयक डॉ. नाथा चितळे यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

     डॉ.सतीश साळुंके व ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी या नाटकाचे लेखन केले असून तन्मय ग्रुप, नांदेडच्या कलावंतांनी हा प्रयोग सादर केला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभाग प्रधान सचिव विकास खारगे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (भा.प्र.से.), सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाचे आयोजन केले होते.

     यावेळी केंद्र प्रमुख रमेश राठोड, विजय मडावी, निवृत्त केंद्र प्रमुख शिवाजी खुडे , प्राचार्या शुभांगीताई ठमके, प्राचार्या संगिता राठोड , प्राचार्य शेख हैदर, उप मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, प्रा. आनंद सरतापे, राम बुसमवार , दीपक डंबाळे, गंगाधर कदम आदींसह गोकुंदा- किनवट येथील विविध शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व रसिक श्रोते बहुसंख्येनं उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad