Type Here to Get Search Results !

कोसमेट शिवारात जुगार अड्ड्याचा कुंभमेळा ; अनेकांचे घरे उद्ध्वस्त , पोलिसांची बघ्याची भूमिका



किनवट / गजानन वानोळे


किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल मधील जवळच असलेल्या कोसमेट शिवारात लाखो रुपयाचा जुगार अड्डा खुलेआम सुरू आहे . या जुगार व अवैध दारू विक्री ग्रामीण भागात अतिशय मोठ्या प्रमाणात खुलेआम चालू असताना दिसत आहे. मात्र पोलिस अधिकारी यांचे सोयीस्कर भांडवल तयार झाले असून दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे .

कोसमेट शिवारात जुगार अडड्याचा जणू काही बाजारच भरला त्या बरोबर अवैध दारू विक्री असे दिवसेंदिवस चालू असले तर अनेकांचे संसार उघड्यावर येऊन उधवस्त होतील असा प्रश्न येथील जाणकार व्यक्तीना पडला आहे . या जुगार अड्ड्यामुळे आत्महत्येचे प्रकार सुद्धा घडताना पाहावयास मिळत आहे . ग्रामीण भागात असेच जुगार अड्डे

 खुलेआमपणे सुरू असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेही दिसून येत नाही संबधीत बीट अंमलदारांना बेकायदा धंद्याची माहिती असुन देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे 

पोलिस विभागाचे सोयीस्कर या अवैध व्यावसायाकडे दुर्लक्ष होत असल्याचे इस्लापूर भागातील अवैध धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंद्यावर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे. काही पोलिसाची चेरी मेरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे काही पोलिस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात . असे चर्चेला उधान परिसरात लागले आहे . या अवैध धंद्यामुळे अनेकांचे घरे उद्ध्वस्त होत आहे. याकडे कोणाचेच लक्ष केंद्रित होत नाही. स्थानिक पोलिस अधिकारी जरी काही कारवाई करत नसतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे या अवैध जुगार व मटका अशा अवैध धंद्याना कठोर कारवाई करून पूर्णविराम करतील का? असा संभ्रम येथील जनतेत निर्माण झाला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad